Happy Valentine’s Day Wishes, Quotes, Messages, and Images in Marathi For Girlfriend, Wife, Husband and Boyfriend

प्रेमाचा आणि रोमँटिक नात्यांचा उत्सव म्हणजे व्हॅलेंटाईन डे, जो दरवर्षी 14 फेब्रुवारीला संपूर्ण जगभर साजरा केला जातो. प्रेमी युगुलांसाठी हा दिवस खास असतो, कारण ते आपल्या भावना व्यक्त करण्याची आणि आपल्या जोडीदाराला आनंदी करण्याची संधी साधतात. काहीजण आपली प्रेमभावना शब्दांत मांडतात, तर काहीजण रोमँटिक मेसेज आणि गोड कोट्सच्या माध्यमातून आपल्या प्रेमाचा सुंदर अनुभव देतात. जर तुम्हालाही तुमच्या प्रिय व्यक्तीला व्हॅलेंटाईन डेच्या खास शुभेच्छा द्यायच्या असतील, तर येथे दिलेले रोमँटिक मेसेज, कोट्स, स्टेटस आणि फोटो शेअर करून तिला/त्याला आनंदी करू शकता!
हॅपी व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा | Valentine wishes in marathi 2025
तुझे माझे नाते असे असावे जे
शब्दांच्या पलीकडे एकमेकांस उमगावे,
कितीही एकमेकांपासून दूर असलो तरी
मनाने कायम एकमेकांच्या जवळ असावे.
Happy Valentine’s Day!
माझ्या तुझ्यावरील प्रेमाचे वर्णन
करण्यात शब्द कमी पडतील,
तुझ्याबरोबर जगण्यासाठी
एक आयुष्य खूप लहान असेल.
व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा!
प्रत्येक क्षणाने म्हटलंय एका क्षणाला क्षणभरासाठी,
माझ्या समोर ये पळभराची ती साथ,
अशी काही असो की रोमारोमात तूच बहरून येऊ दे..!
हॅपी व्हॅलेंटाईन डे!
तुला पाहता क्षणी भुललो तुझ्या प्रेमात,
गोडवा आणि प्रेम राहो आपल्या नात्यात,
मागशील ते ठेवेल तुझ्या पुढ्यात,
होकार कळव मला या क्षणात.
व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा!
आयुष्यात जर एकापेक्षा जास्त वेळा प्रेम होत असेल तर,
प्रत्येक वेळी मी फक्त तुझ्यावरच प्रेम करेल,
आणि मला ते आवडेल.
Happy Valentine’s Day!
माझ्या चेहऱ्यावरील हसू आहेस तू,
माझ्या धडधडणाऱ्या हृदयातील श्वास आहेस तू,
माझ्या हसणाऱ्या ओठांवरील सुंदरता आहेस तू,
ज्यासाठी माझं हृदय व श्वास सुरू आहेत ती माझी सर्वस्व आहेस तू!
हॅपी व्हॅलेंटाईन डे!
प्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतं,
हृदयाला हृदयाशी जोडणारं खास नातं असतं.
हॅप्पी व्हॅलेंटाईन डे!
माझ्या हृदयात वाजणारा स्वर तूच आहेस,
आयुष्यभर मला हा एकच राग आळवायचा आहे,
तुझ्यासोबत सूर जुळवत जगायचे आहे.
Happy Valentine’s Day!
तुझ्या प्रेमाचा रंग तो अजूनही बहरत आहे,
शेवटच्या क्षणापर्यंत मी फक्त आणि फक्त तुझीच आहे.
हॅप्पी व्हॅलेंटाईन डे!
कसा विसरू तुला मी एका मिनिटासाठी तरी,
जेव्हा प्रेम झालंय आणि साथ हवी आहे जन्मभराची.
हॅपी व्हॅलेंटाईन डे!
थंडगार रात्री तुझ्या गळ्यावर
उबदार श्वासांची माळ सजवायची आहे,
हळूहळू तुझं बालपण जिवंत करायचं आहे.
हॅपी व्हॅलेंटाईन डे!
तुला सात जन्मांचे वचन नाही देत बसणार,
पण ह्या जन्मात मरेपर्यंत साथ नक्कीच देणार..!
Happy Valentine’s Day!

तुझ्यावर एवढं प्रेम करेल की,
याच जन्मी काय पुढच्या सातही जन्मी,
तू फक्त मलाच मागशील.
Happy Valentine’s Day!
व्हॅलेंटाईन होशील माझी आता,
दिवस ठरेल खास तो.
हॅपी व्हॅलेंटाईन डे!
आयुष्यभर साथ देणारी माझी सावली आहेस तू,
माझ्या डोळ्यात नेहमी राहणार, स्वप्न आहेस तू,
हात जोडून देवाकडे जे मागितलं होत ते मागणं आहेस तू…
Happy Valentine’s Day!
जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचं असतं,
तेच प्रेम आयुष्यभर मनात जपायचं असतं.
Happy Valentines Day
माझ्या हृदयात वाजणारा स्वर तूच आहेस,
आयुष्यभर मला हा एकच राग आळवायचा आहे.
तुझ्यासोबत सूर जुळवत जगायचे आहे.
Happy Valentine Day
आयुष्यात जर एकापेक्षा जास्त वेळा प्रेम होत असेल तर,
प्रत्येक वेळी मी फक्त तुझ्यावरच प्रेम करेल.
Happy Valentine Day
तुला पाहता क्षणी भुललो तुझ्या प्रेमात,
गोडवा आणि प्रेम राहो आपल्या नात्यात,
मागशील ते ठेवेल तुझ्या पुढ्यात,
होकार कळव मला या क्षणात.
प्रेमाच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
Happy Valentine Day
ना Rose पाहिजे,
ना Chocolate पाहिजे,
ना Teddy ना Kiss पाहिजे,
मला फक्त तुझी आयुष्यभराची साथ पाहिजे.
Happy Valentine Day
माझ्या चेहऱ्यावरील हसू आहेस तू,
माझ्या हृदयातील श्वास आहेस तू,
माझ्या ओठांवरील सुंदरता आहेस तू,
ज्यासाठी माझं हृदय व श्वास सुरू आहेत
ती माझी सर्वस्व आहेस तू.
Happy Valentine Day
बंध जुळले असता, मनाचं नातंही जुळायला हवं,
अगदी स्पर्शातूनही सारं सारं कळायला हवं.
Happy Valentines Day
कसा विसरू तुला मी एका मिनिटासाठी तरी,
जेव्हा प्रेम झालंय आणि साथ हवी आहे जन्मभराची.
Happy Valentine Day
रात्री चंद्र असा सजला होता,
ताऱ्यांनी चिंब भिजला होता,
बस्स, तुझ्या येण्याचा अवकाश पाहुन,
बिचाऱ्याचा चेहरा पडला होता!
Happy Valentine Day
तुला सात जन्माचे वचन नाही देत बसणार,
पण ह्या जन्मात मरेपर्यंत साथ नक्कीच देणार..!
Happy Valentine Day
तू माझ्या आयुष्याचा फक्त एक भाग नाहीस,
तू माझे जीवन आहेस.
या विशेष दिवशी,
माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हेच सांगायचंय.
Happy Valentine Day
प्रेम व्यक्त करायला एक दिवस पुरेसा नाही,
प्रेमाचा हा बहर असाच युगान् युगे असू दे,
कारण प्रेम ही भावना काही तासांची नाही,
तर ही जन्मोजन्मीची राहू दे.
Happy Valentine Day

हळुवार जपून ठेवलेले क्षण,
तेच माझ्या जगण्याची आस आहे,
एकेक साठवून ठेवलेली आठवण,
तीच माझ्यासाठी खास आहे…
Happy Valentine Day
तो तिच्याकडे पहायचा तेव्हा,
नेमकं तिचं लक्षच नसायचं,
खरंतर तो पाहतोय की नाही,
यावर तिचं बारीक लक्ष असायचं.
Happy Valentine Day
मनाच्या तारा जुळून आलेल्या,
सहवासाचा एक मधुर राग छेडलेला,
संगतीत तुझ्या फुललेले जीवन,
तुझ्या-माझ्या मैत्रीचा वेल गगनाशी भिडलेला.
Happy Valentines Day
माझ्या तुझ्यावरील प्रेमाचे वर्णन,
करण्यात शब्द कमी पडतील.
तुझ्याबरोबर जगण्यासाठी,
एक आयुष्य खूप लहान असेल.
Happy Valentine Day
तुझ्या प्रेमाच्या बाहुपाशाशिवाय,
अधिक सुख कसलेच नाही,
मला पाहिल्यावर तुझ्या हृदयाचे जे ठोके ऐकू येतात,
त्याशिवाय आनंद कशातच नाही.
Happy Valentine Day
डोळ्यातल्या स्वप्नाला,
कधी प्रत्यक्षातही आण,
किती प्रेम करतो तुझ्यावर,
हे न सांगताही जाण.
Happy Valentines Day
प्रेमाला वयाचं बंधन नाही,
प्रेमाला शब्दाचं बंधन नाही,
प्रेम ही अशा भावना आहे की,
त्याच्यासाठी फक्त एक दिवस पुरेसा नाही.
Happy Valentine Day
माझे हृदय, माझी धडधड, माझे स्वप्न,
सर्व तुझ्या प्रेमात रंगले आहे.
तुझ्या शिवाय आयुष्य अपूर्ण वाटतं.
Happy Valentine Day
तु माझ्या आयुष्यातील मोलाचा क्षण,
प्रत्येक वेळी येते तुझी आठवण,
राहू दे सदैव असेच प्रेम तुझे माझ्यावर,
अशीच साथ देऊया एकमेकांना आपण.
Happy Valentine Day
प्रेम म्हणजे काय असते,
हे तुझ्या सहवासात कळाले.
तू माझ्या आयुष्यात आल्याने,
स्वर्गसुख मिळाले.
कधी सोडू नकोस साथ,
माझी जन्मभर राहिन मी फक्त तुझी!!
Happy Valentine Day
बंध जुळले असता,
मनाचं नातंही जुळायला हवं,
अगदी स्पर्शातूनही,
सारं सारं कळायला हवं..
Happy Valentines Day
आयुष्यात जर एकाच वेळी प्रेम होत असेल,
तर मी ते फक्त तुझ्यावरच करेल.
Happy Valentine Day
प्रेमाचा रंग तो, अजूनही बहरत आहे,
शेवटच्या क्षणापर्यंत, मी फक्त तुझीच आहे.
Happy Valentine Day
आता राहवेना मुळीच,
कसे सांगू हे तुला?
दाटून येते आभाळ सारे,
दे सोबती हात मला.
Happy Valentines Day

Valentine Day 2025 Wishes in Marathi For Wife | व्हॅलेंटाइन डे शुभेच्छा मराठी बायको
माझ्या जीवनातील सर्वात सुंदर कविता तू आहेस,
माझ्या हृदयातील प्रत्येक ठोक्यात तू आहेस,
तुझ्या प्रेमाशिवाय आयुष्य अपूर्ण आहे.
हॅप्पी व्हॅलेंटाईन डे 2025!
तू फक्त माझी बायको नाहीस,
तू माझं प्रेम, माझी ताकद आणि माझं संपूर्ण जग आहेस.
तुझ्या सहवासात प्रत्येक क्षण स्वर्गासारखा भासतो.
व्हॅलेंटाईन डेच्या हार्दिक शुभेच्छा!
तूच माझी पहिली आणि शेवटची प्रेमकहाणी,
तुझ्याशिवाय हा प्रवास अपूर्णच राहील.
आयुष्यभर तुझ्या प्रेमातच राहायचं आहे.
हॅप्पी व्हॅलेंटाईन डे, माझ्या प्रिय पत्नी!
तुझ्या डोळ्यांमध्ये स्वप्नं माझी,
तुझ्या हास्यात माझी दुनिया,
आयुष्यभर फक्त तुझ्या प्रेमात राहायचं आहे.
हॅप्पी व्हॅलेंटाईन डे 2025!
प्रत्येक सकाळ तुझ्या हास्याने सुरू होते,
रात्र तुझ्या मिठीत विसावते,
तुझ्याशिवाय माझं आयुष्य अधुरं आहे.
माझ्या प्रिय पत्नीला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा!
तुझं प्रेम हेच माझं सर्वस्व आहे,
तुझ्या प्रेमाशिवाय माझं अस्तित्वच नाही.
सात जन्म तुलाच म्हणून मागतोय.
हॅप्पी व्हॅलेंटाईन डे, प्रिय पत्नी!
तू माझी प्रेरणा, तूच माझी ताकद,
तुझ्या प्रेमामुळेच आयुष्य सुंदर वाटतं.
तुला आयुष्यभर प्रेम करायचं वचन देतो.
व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा!
तुझ्यासोबत जगणं म्हणजे रोज प्रेमाचा नवा रंग,
तुझं प्रेम हेच माझं जगण्याचं कारण.
तुझ्यासाठी प्रत्येक दिवस व्हॅलेंटाईन डेच आहे!
💖 माझ्या प्रिय पत्नीला व्हॅलेंटाईन डे 2025च्या अनंत शुभेच्छा! 💖