Essay In Marathi For 10th Standard आज आपण पाहणार आहोत इयत्ता दहावी मध्ये निबंध येणारे जसे की पाणी आडवा पाणी जिरवा, वृक्षवल्ली आम्हाला सोयरे, प्रदूषण, झाडे इत्यादी निबंध आज आपण पाहणार आहोत जे की तुम्हाला परीक्षेत किंवा गृहपाठलेनास व्यक्त ठरतील.
Essay On Save Water In Marathi
Table of Contents
पाणी अडवा – पाणी जिरवा
हवा, पाणी ही निसगनि मानवाला दिलेली मुक्त देणगी आहे. पाणी हे जीवनावश्यक असल्यामुळे पाण्याच्या टंचाईची समस्या सोडवण्याला अग्रक्रम दयावा लागते. खेडधापाड्यांतून ही समस्या फारच बिकट आहे. शहरात ठरावीक वेळी पाणी येत असेल, तर सर्व व्यवहार झटपट उरकून पाणी भरून ठेवता येते. पण खेड्यापाड्यांतील लोकांना घडाभर पाण्यासाठी मैलोन्मैल चालत जावे लागते किंवा गावात येणाऱ्या टैंकरमधून, कष्टपूर्वक पाणी मिळवावे लागते. अर्थातच मिळालेल्या पाण्याचा उपयोग प्रथम पिण्यासाठी व अन शिजवण्यासाठी करणे भाग पडते. स्वच्छतेसाठी पाणीच उपलब्ध नसल्यामुळे अस्वच्छतेतून रोगराईचा प्रादुर्भाव झाल्यास नवल काय ? माणसाच्या दैनंदिन व्यवहारासाठी पाण्याची एवढी चणचण भासते, तर शेतीला आणि वनस्पतींच्या वाढीला पाण्याची गरज किती पराकोटीची असेल, याची कल्पना केलेलीच बरी !
वास्तविक, भारत हा नदांचा देश आहे. भारताच्या काही भागांत पावसाचे पाणीही
भरपूर मिळते. कोकणात व इतर अनेक ठिकाणी प्रचंड पाऊस पडतो. पावसाळ्यात भारतातील काही नदघांना पूर येतात. ब्रह्मपुत्रा, गंगा, यमुना, गोदावरी इत्यादी नक्ष्यांना येणाऱ्या पुरांमुळे आजूबाजूच्या प्रदेशाची वाताहत झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रांत वारंवार येतात. याचा अर्थ असा की, उपलब्ध होणाऱ्या पाण्यापैकी ८० टक्के पाणी वाहून जाते, हे भारताचे दुर्दैव आहे.
धरण बांधून पाणी अडवणे हा त्यावरचा एक उपाय आहे. तसेच, देशभरच्या नदया एकमेकांना जोडून नदयांचे जाळेच निर्माण करण्याची एक योजना सध्या सरकारच्या विचाराधीन आहे. हा फारच मोठा फायदा देणारा उपाय आहे. पण ही योजना अत्यंत खर्चिक आणि खूप वर्षे लावणारी आहे. काही धरणांमुळे काही लोकांची सोय झाली असली तरी अजून असे कितीतरी जिल्हे आहेत की, जिथे उन्हाळ्यात लोकांना थेंबभर पाणी मिळणे मुश्कील होते.
भाक्रा-नानगल, दामोदर व्हॅली, कोयना, नाथसागर, नागार्जुनसागर अशी धरणे भारतात ठिकठिकाणी गेली, ही गोष्ट चांगली आहे. पण धरणांमुळे इतरही काही समस्या निर्माण धरणांमुळे खेड्यापाड्यांत वीज पोहोचली हे झाले; पण त्यामुळे विजेवर चालणारे पाण्याचे पंप वापरले जाऊ लागल्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होऊन विहिरी कोरड्या पडल्या. नदांचे पाणी धरणांकडे खेचले गेल्यामुळे नदया कोरड्या पडल्या, विजेमुळे कारखाने सुरू झाले ही गोष्ट चांगली घडली; पण कारखान्यातील दूषित पाणी नदीत सोडले गेल्यामुळे जलप्रदूषण होऊ लागले. गंगा-यमुनेसारख्या मोठ्या नट्या इतक्या प्रदूषित झाल्या आहेत की, त्या शुद्ध करण्यासाठी कित्येक हजार कोटी रुपयांच्या योजना आखण्याची गरज निर्माण झाली आहे.
Essay On Forest Conservation In Marathi
- झाडे लावा – पर्यावरण जगवा
पृथ्वीची अवस्था प्रदूषणामुळे दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पृथ्वीवरील वातावरणाचा तोल ढळत आहे. ‘पृथ्वीला वाचवा, आपल्या पृथ्वीची काळजी वाहा’ हा ‘वसुंधरा दिना ‘चा संदेश आहे. परंतु प्रचंड प्रमाणात वाढलेल्या वृक्षतोडीमुळे एक दिवस ही पृथ्वी रसातळाला जाईल, अशी भीती निर्माण झाली आहे.
केवळ जंगलतोडीमुळेच पर्यावरणाचा तोल ढळतो असे नाही; महानगरे आणि कारखानेही या दुरवस्थेला हातभार लावत असतात. गावोगावच्या नक्ष्यांमध्ये कचरा व सांडपाणी सोडले जात आहे. उसाच्या मळीमुळे शेते निकामी होत आहेत. पावसाअभावी वाळवंटे वाढू लागली आहेत. अशी अनेक संकटे आपल्यापुढे उभी आहेत.
पर्यावरणाचा ढासळणारा तोल सावरण्याचा एक महत्त्वाचा उपाय म्हणजे वृक्षारोपण होय. अलीकडे वृक्षारोपणाचे कार्यक्रम होतात. ‘सामाजिक वनीकरणा’ची कल्पना आता रूढ होत आहे. झाडे लावणे जितके आवश्यक आहे, त्याहूनही ती वाढवणे व त्यांचे जतन करणे महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येकाने एकतरी झाड दत्तक घेतले पाहिजे. झाडे लावली आणि त्यांची काळजी घेतली नाही तर काय उपयोग? निष्काळजीपणामुळे अनेक झाडे मरतात. कधी
त्यांना पाणी मिळत नाही. कधी भुकेलेली जनावरे लावलेली रोपटी खाऊन टाकतात. त्यामुळे लावलेल्या झाडांतील फारच थोडी झाडे मोठी होतात.
यासाठी आता मोहीम सुरू केली पाहिजे-‘एकतरी झाड जगवा.’ लग्न, मुंजी, वाढदिवस अशा निमित्ताने आपण भेटीदाखल पुष्पगुच्छ देतो, त्याऐवजी एक-एक रोष भैर दयावे. नवीन बालक जन्माला आले की, त्या कुटुंबाने नवीन झाड लावावे व बाळाबरोबर त्यालाही बाळासारखे ममतेने वाढवावे. शाळेतील प्रत्येक मुलाने आपापल्या परिसरात एक तरी झाड लावावे व त्याचे नीट संगोपन करावे, प्रेमाने देखभाल करावी.
शहरातील राखीव भूखंडांवर टोलेजंग इमारती उभारण्याऐवजी गर्द झाडे लावावीत. सरकारी गृहनिर्माण संस्थांनी आपल्या वास्तूच्या परिसरात झाडे लावावीत. रस्त्याच्या दुतर्फा वृक्षांची लागवड करावी. निसर्गचक्र खंडित करण्याचां आपल्याला अधिकार नाही. ते आहे तसे अबाधित राखण्यातच मानवजातीचे हित आहे. पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भवितव्याची जबाबदारी आपल्यावर आहे. म्हणून ‘एकतरी झाड जगवा!’ हा आजच्या युगाचा संदेश आहे. या संदेशाप्रमाणे आपण वागलो, तर ही वसुधा पुन्हा ‘हरितश्यामल’ बनेल.
Essay On Tree In Marathi
- वृक्षवल्ली आम्हां सोयरी
‘वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे’ हे संसारात राहूनही विरक्त जीवन जगणाऱ्या तुकाराम बोल आहेत. आपल्यासारख्या चालत्या-बोलत्या माणसांपेक्षा जंगलातील, उपवनातील वृक्ष-वेली त्यांना आपल्याशा वाटतात. मानवी जगातील क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर अशा विकारांपासून दूर असणारी ही वृक्ष-वेली तुकारामांना जास्त आवडतात; कारण त्यांच्या सहवासातच या महान भक्ताला आपल्या मनाशी संवाद साधता येतो.
मानव आणि ही वनस्पतिसृष्टी ही एकाच विधात्याची लेकरे. पण आज माणूस निसर्गापासून दूर गेला आहे. स्वतः केलेल्या प्रगतीमुळे त्याच्यातील अहंकार वाढला आहे. ‘मला काहीही अशक्य नाही,’ असे तो मानतो. आपला भूतकाळ तो विसरून गेला आहे. याच निसर्गाच्या कुशीत आपण वाढलो, हे तो विसरला आहे. याच वृक्षवल्लीच्या सान्निध्यात नित्य विहार करणाऱ्या आपल्या ऋषिमुनीनी ‘वेद’ रवले. भारतीय संस्कृतीची भक्कम बैठक आम्हांला दिली, हे सारे सोयीस्करपणे आपण विसरलो आहोत.
प्रगतीचा कैफ चढलेल्या माणसांनी परमेश्वरनिर्मित निसर्गावर घाला घातला आहे. विवेक हरवून बसलेल्या आजच्या माणसांत चंगळवादाला उधाण आले आहे. मोठमोठ्या इमारती उभारण्यासाठी दाट अरण्ये उद्ध्वस्त केली जात आहेत. अन्न शिजवण्यासाठी, शेकोटी पेटवण्यासाठी, घरे सजवण्यासाठी वारेमाप जंगलतोड केली जात आहे. कायदयाचा बडगा उगारला तरी कोट्यवधी रुपयांच्या चंदनाची चोरी होतच आहे.
हे सारे पाहिले को वाटते, हा माणूस किती अविचारी आहे! निसर्ग जणू माणसाला सांगतो की, अरे, हे वृक्ष वर्षानुवर्षे जंगलात उभे आहेत ते तुमच्यासाठीच ना ! त्यांची फुले, फळे, पाने, सावली हे सारे तुमच्यासाठीच आहे ना । म्हणून तर तुमच्या पूर्वजांनी त्यांची बरोबरी संतपुरुषांबरोबर केली. वृक्ष बाहू पसरून आपल्यासाठी पावसाची प्रार्थना करतात. आपल्या मुळांनी पायाखालची जमीन घट्ट पकडून ठेवतात. जमिनीची धूप थांबवतात, वातावरणातील प्रदूषण टाळण्यासाठी प्रयत्न करतात. अनेक अमूल्य औषधे देतात.
हे वृक्ष, या वेली अनेक मौलिक गोष्टी आपल्याला देतात. उदात्तता, भव्यता आणि निर्मलता ही तर त्यांची ठेवच आहे. पण ‘सर्वांशी समान वागणूक’ हा त्यांच्या जीवनातून मिळणारा संदेश आहे. म्हणून माणूस आपल्या मुलाबाळांशी जसा वागतो, तसाच तो झाडांशीही वागला पाहिजे, संदेश जाणून सामाजिक वनीकरणाचे व्रत सर्वांनी स्वीकारले पाहिजे.
Essay On Pollution In Marathi
- प्रदूषण – एक समस्या
भारतीय माणूस व्यक्तिगत स्वच्छतेचा जेवढा विचार करतो, त्याच्या शतांशाने देखील हो सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष देत नाही. स्वतःच्या घरातील कचरा तो रस्त्यावर टाकतो. पानाच्या पिचकाऱ्या टाकतो वा निरुपयोगी कागदांचे कपटे कोठेही फेकून देतो. आपल्याकडील भाजीविक्रीच्या मंडया या कचऱ्याच्या ढिगांनी भरलेल्या दिसतात. हे सारे हवेच्या प्रदूषणाला आमंत्रण ठरते. त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडवत आहोत, याची आम्हांला जाणीवच नसते.
कारखान्यांमुळे वायूप्रदूषण होते. तसेच, कारखान्यातील दूषित, मलीन पाण्यामुळे नदया व समुद्र यांचे पाणी दूषित होते. समुद्रातील या दूषित पाण्यामुळे त्यातील मासे प्रचंड
प्रमाणात मरतात. नदयांतील पाणी दूषित झाल्यामुळे पिण्यासाठी किंवा अन्य कोणत्याही कामासाठी ते निरुपयोगी ठरत. आहे. पाणी दूषित झाल्यावर ते स्वच्छ करण्याचा आटापिटा करण्याऐवजी ते दूषित न होण्याची काळजी आपण घ्यायला नको का?
हवा, पाणी यांबरोबर ‘ ध्वनिप्रदूषण’ ही आज एक मोठी ज्वलंत समस्या ठरली आहे. विशेषतः शहरांतील गर्दी, गोगाट यांमुळे ध्वनिप्रदूषण वाढत आहे. आपली उत्सवप्रियता फार अजब आहे. हे सारे उत्सव ध्वनिवर्धकांवाचून साजरे होत नाहीत. मोठमोठ्या आवाजात गाणी लावणे, बँड वाजवणे, अॅटमबॉम्बसारखे मोठ्या आवाजाचे फटाके लावणे व शहरांतील वाहनांची वाढती संख्या यांमुळे ध्वनिप्रदूषण व हवेचे प्रदूषण होते. प्लास्टिकच्या पिशव्या व शहरात तयार होणारा घनकचरा ही एक वेगळीच डोकेदुखी झाली आहे.
पृथ्वीच्या भोवती असलेल्या वायूंच्या आवरणात ओझोन वायूचा एक थर आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टीचे संरक्षण होण्यासाठी हा वायू आवश्यक आहे. पृथ्वीवरील वाढत्या प्रदूषणामुळे कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढत आहे. हा वायू ओझोनवर अतिक्रमण आहे आणि या हल्ल्यात ओझोन नष्ट झाला, तर सूर्याचे अल्ट्राव्हायोलेट किरण पृथ्वीवर येतील व
येथील जीवसृष्टी पार नष्ट होईल, अशी भीती वाटते.
या प्रदूषणांवर उपाय म्हणून समाजाने म्हणजेच सरकारने काही ठाम निर्णय घेतले
पाहिजेत आणि व्यक्तिगत आपण प्रत्येक नागरिकाने आपल्या काही सवयी बदलल्या पाहिजेत. झाडे तोडणे हा सरकारने मनुष्यवधाइतकाच गंभीर गुन्हा मानला पाहिजे. कारखान्यांतून व वस्त्यांतून वाहून येणाऱ्या सांडपाण्यावर सक्तीने प्रक्रिया करायला लावले पाहिजे. अशा त-हेने प्राप्त झालेले पाणी बागेसाठी, शेतीसाठी वा गाड्या धुण्यासाठी वापरता येऊ शकते. प्लास्टिकच्या वापरावर कठोर बंधने आणली पाहिजेत. आपणही प्लास्टिक पिशवीऐवजी कापडी पिशवी वापरण्याची सवय लावून घेतली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी ध्वनिवर्धक वापरण्यास बंदीच घातली पाहिजे. आनंद व्यक्त करण्याच्या आपल्या पद्धतीतही आपण बदल केला पाहिजे. ध्वनिवर्धकावर गाणी वाजवणे वा फटाके वाजवणे या प्रकारांनीच आनंद व्यक्त होतो, हे आपण विसरले पाहिजे. शाळा-महाविदयालयांनी जवळपासच्या उघड्याबोडक्या डोंगरांवर, मोकळ्या जागी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचे उपक्रम राबवले पाहिजेत. हे सर्व कठीण वाटले तरी आपण केले पाहिजे; कारण आता आपल्या अस्तित्वाचाच प्रश्न उभा राहिला आहे.