दिवाळी शुभेच्छा मराठी संदेश | Happy Diwali Wishes in Marathi

By vedu Oct 27, 2024
दिवाळी शुभेच्छा मराठी संदेश | Happy Diwali Wishes in Marathi

दिवाळी, ज्याला आपण दीपावली असेही म्हणतो, हा भारताच्या जवळपास सर्व भागांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होणारा सण आहे. हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो आणि आनंद, सुसंवाद, आणि विजयाचे स्मरण करून देतो. महाकाव्य रामायणात ‘प्रभू राम वनवासातून परत आल्यानंतर केलेला आनंदोत्सव’ म्हणून याचे वर्णन केले आहे. दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण, जो भारतातील सर्वात मोठा आणि भव्य सण मानला जातो. हा सण दरवर्षी साधारणपणे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येतो.

दिवाळीचा सण पाच दिवस चालतो – धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, आणि भाऊबीज. या उत्सवाचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी, ज्याला संपत्तीची पूजा असेही म्हणतात. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि नवीन मौल्यवान वस्तू खरेदी करण्याची प्रथा आहे. दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी किंवा छोटी दिवाळी असते. या दिवशी लोक सकाळी लवकर उठून सुगंधी तेल लावून स्नान करतात, ज्यामुळे त्यांच्या जीवनातील पापे आणि अशुद्धता दूर होतात. तिसरा दिवस मुख्य दिवाळीचा दिवस असतो, ज्याला लक्ष्मीपूजन म्हणतात. या दिवशी संपत्तीची देवता लक्ष्मीची पूजा मोठ्या भक्तिभावाने केली जाते. लोक नवीन कपडे घालतात, पूजा करतात आणि दिवे लावून व फटाके फोडून आनंद साजरा करतात. चौथा दिवस गोवर्धन पूजा किंवा पाडवा म्हणून साजरा होतो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने विशाल गोवर्धन पर्वत उचलून इंद्राचा पराभव केला होता असे मानले जाते. लोक गायीच्या शेणाचा वापर करून गोवर्धनाचे प्रतीक असलेली छोटी टेकडी बनवून त्याची पूजा करतात. पाचवा आणि शेवटचा दिवस भाऊबीज असतो. या दिवशी बहिणी आपल्या भावाला ओवाळतात आणि त्यांच्या दीर्घ आणि आनंदी आयुष्यासाठी प्रार्थना करतात, तर भाऊ आपल्या बहिणींना भेटवस्तू देतात.

वसुबारस
गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपल्याला लाभो!

धनत्रयोदशी
धन्वंतरी आपल्यावर सदैव प्रसन्न असू देत! निरोगी, आरोग्यदायी जीवन मिळो, आणि धनवर्षाव अखंडित होवो!

नरक चतुर्दशी
सत्याचा असत्यावर सदैव विजय असो! अन्यायाचा प्रतिकार करण्याचे बळ आपल्याला मिळो, सत्कर्म घडत राहो, आणि स्वर्गसुख नित्य अनुभवता येवो!

लक्ष्मीपूजन
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरात नित्य असू दे! चांगल्या मार्गाने समृद्धी मिळो, आणि लक्ष्मीपूजनाचे सौख्य नेहमी लाभो!

पाडवा अर्थात बलिप्रतिपदा
पाडव्याच्या आगमनाने आयुष्यात गोडवा नांदो! सत्याचा विजय प्रेरणादायी ठरो, आणि थोरांच्या आशीर्वादाने आयुष्य बहरो!

भाऊबीज
जिव्हाळ्याचे बंध दररोज अधिक दृढ होत राहो! भाऊ-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहो!


“उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट!!
शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली…”


“दिवाळीची आली पहाट,
रांगोळ्यांचा केला थाट,
अभ्यंगाला मांडले पाट, उटणी,
अत्तरे घमघमाट, लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट,
पणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट! दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!!!”


“रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी. दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…”


“तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख, लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!”


“आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात,
सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ.
हि दिवाळी आनंदाची, सुखसमृध्दीची जावो…”


“प्रेमाचे दीप जळो, प्रेमाच्या फुलबाज्या उडो,
प्रेमाची उमलावी फुले, प्रेमाच्या पाकळ्या,
प्रेमाची बासरी, प्रेमाच्या सनया-चौघडे,
आनंदाचे दीप जळो, दुःखाची सावलीही न पडो. दिवाळीच्या खूप शुभेच्छा!!!”


“घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,
माळोनी गंध मधुर उटण्याचा.. करा संकल्प सुंदर जगण्याचा,
गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..
दीपावली शुभेच्छा! दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा!!!”


“सगळा आनंद सगळे सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्णता,
यशाची सगळी शिखरे, सगळे ऐश्वर्य, हे आपल्याला मिळू दे,
ही दीपावली आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा देवू दे…”


“पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा
, तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा, नवे स्वप्न,
नवे क्षितीज, सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!”


“उत्कर्षाची वाट उमटली विरला गर्द कालचा काळोख…
क्षितिजावर पहाट उगवली,
घेऊनिया नवा उत्साह सोबत… दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…”


“आपल्या जीवनातल्या अंधाराचा नाश होवो,
कर्माची वात, भक्तीचं तेल, आत्मजाणिवेची ज्योत लावून आपल्या ज्ञानाचा प्रकाश सदैव तेवत राहो…
हीच ईश्वरचरणी सदिच्छा!!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!”


“मराठमोळी संस्कृती आपली, मराठमोळा आपला बाणा,
मराठमोळी माणसे आपण, मराठमोळी आपली माती,
अशीच चिरंतन राहो आपली ही प्रेमाची नाती,
शुभ दिपावली…”


“उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट.. दिव्यांची आरास,
फराळाचे ताट.. फटाक्यांची आतिषबाजी,
आनंदाची लाट.. नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट..
शुभ दीपावली..!”


“सोनेरी प्रकाशात, पहाट सारी न्हाऊन गेली,
आनंदाची उधळण करीत, आली दिवाळी आली,
नवे लेणे भरजारी, दारी रांगोळी न्यारी,
गंध प्रेमाचा उधळीत, आली आली दिवाळी आली…”


“यशाची रोशनी, समाधानाचा फराळ, मंगलमय रांगोळी,
मधुर मिठाई, आकर्षक आकाशकंदील,
आकाश उजळवणारे फटाके,
या दिवाळीत हे सगळं तुमच्यासाठी दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा…”


“दिवाळी अशी खास, तिच्यात लक्ष्मीचा निवास,
फराळाचा सुगंधी वास, दिव्यांची आरास,
मनाचा वाढवी उल्हास, अशा दिवाळीच्या शुभेच्छा तुमच्यासाठी खास !!”


“नक्षत्रांची करीत उधळण, दीपावली ही आली..
नवस्वप्नांची करीत पखरण, दीपावली ही आली..
सदिच्छांचे पुष्पे घेउनी, दीपावली ही आली..
शुभेच्छांचे गुच्छ घेउनी, दीपावली ही आली.. दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!!!”


“चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती, टीचभर कापूस म्हणे,
मी होईन वाती, थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी,
ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती, अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती.!
दिपावलीच्या हार्दिक शुभेछा!!!”


“उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन, आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट !!,
शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली…”


“चंद्राचा कंदील घरावरी, चांदण्यांचे तोरण दारावरी..
क्षितीजाचे रंग रांगोळीवरी, दिवाळीचे स्वागत घरोघरी..!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभ दीपावली…”


दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी,
इडा – पिडा जाऊ दे, बळीचं राज येऊ दे!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


सर्व मित्र परिवाराला …
दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,
चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
दीपावलीच्या हार्दिक शुभेछा…


काही नकोय तुझ्याकडून
फक्त तुझी साथ हवी आहे
तुझी साथ हि दिवाळीच्या
मिठाई पेक्षा गोड आहे


आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात,
सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ.
हि दिवाळी आनंदाची, सुखसमृध्दीची जावो


दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


स्नेहाचा सुगंध दरवळला
आनंदाचा दिवाळी सण आला
विनंती आमची परमेश्वराला
सौख्य समृद्धि लाभो आपणा सर्वांना


आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात
सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ.
ही दिवाळी आनंद दायी , सुख समृध्दिची जाओ.


उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट !!,
शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली !


पहिला दिवा लागेल दारी,
सुखाचा किरण येईल घरी,
पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,
तुम्हा सर्वांना दिवाळीचा
हार्दिक-हार्दिक शुभेच्छा..!!
शुभ दिवाळी


लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
सगळा आनंद सगळे सौख्य,
सगळ्या स्वप्नांची पूर्णता,
यशाची सगळी शिखरे,
सगळे ऐश्वर्य,
हे आपल्याला मिळू दे,
ही दीपावली आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा देवू
दे…


रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी,
कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…


दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…उत्कर्षाची वाट उमटली
विरला गर्द कालचा काळोख…
क्षितिजावर पहाट उगवली,
घेऊनिया नवा उत्साह सोबत…
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…


दिवाळी अशी खास,
तिच्यात लक्ष्मीचा निवास…
फराळाचा सुगंधी वास,
दिव्यांची आरास…
मनाचा वाढवी उल्हास,
अशा दिवाळीच्या शुभेच्छा…


तुमच्यासाठी खास !!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो…
शुभ दिपावली

Diwali Wishes For Friends In Marathi 2024

दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र,
आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण,
करा प्रेमाची उधळण…


यशाची रोषणाई
कीर्तीचे अभ्यंग स्नान
मनाचे लक्ष्मिपुजन
समृद्धीचे फराळ
प्रेमाची भाऊबीज
अशा मंगल दिवाळीच्या शुभेच्छा


यशाची रोशनी, समाधानाचा फराळ, मंगलमय रांगोळी,
मधुर मिठाई, आकर्षक आकाशकंदिल, आकाश उजळवणारे फटाके!!
येत्या दिवाळीत, हे सगळं तुमच्यासाठी !!
दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा!!


फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही,
सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही,
तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी,
दिपावली सारख्या मंगल प्रसंगी
तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही.
शुभ दिपावली!


फटाक्यांची माळ,
विजेची रोषणाई,
पणत्यांची आरास,
उटण्याची आंघोळ,
रांगोळीची रंगत,
फराळाची संगत,
लक्ष्मीची आराधना,
भाऊबीजेची ओढ,
दिपावलीचा सण आहे खूपच गोड.
दिपावलीच्या मंगलमयी शुभेच्छा ..!


फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई,
चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी,
नव्यानवलाईची दिवाळी येता, आनंदली दुनिया सारी!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


पुन्हा एक नवे वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा
नवे स्वप्न, नवे क्षितीज,
सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

By vedu

Related Post

One thought on “दिवाळी शुभेच्छा मराठी संदेश | Happy Diwali Wishes in Marathi”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *