पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनाच्या वेळी कार्तिक महिन्याच्या अमावास्येला देवी लक्ष्मी प्रकट झाली होती, तर वाल्मिकी रामायणानुसार या दिवशी माता लक्ष्मीचा विवाह भगवान विष्णूशी झाला होता. त्यामुळे दरवर्षी दिवाळीत लक्ष्मीपूजनाचे महत्त्व आहे. या दिवशी शुभ मुहूर्तावर लक्ष्मी-गणेश, कुबेर आणि माता सरस्वती यांची विशेष पूजा केली जाते. या दिवशी केरसुणी, बत्ताशे, पैसे, धान्य, कलश, इत्यादी गोष्टींना विशेष महत्व आहे. त्यामुळे, देवी लक्ष्मीच्या मूर्तीसोबत या गोष्टींचे खास पूजन केले जाते. ही पूजा योग्य पद्धतीने केल्याने आपल्या घरात सदैव माता लक्ष्मीची कृपा राहते, अशी देखील मान्यता आहे
आश्विन अमावास्येला दिवाळी सण साजरा केला जातो. यंदा लक्ष्मी पूजनाचा सण १ नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे. या दिवशी देवी लक्ष्मी आणि श्रीगणेशाची पूजा केली जाते. आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीपासून दिवाळीला सुरुवात होते, तर आश्विन महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीपूजन साजरे केले जाते. दिवाळी हा सण उत्साह, रोषणाई आणि दिव्यांचा मानला जातो आणि हिंदू धर्मात या सणाला खूप महत्त्व आहे. दिवाळी आणि लक्ष्मीपूजनानिमित्त तुमच्या मित्रांना आणि प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा संदेश!
लक्ष्मीपूजेच्या खास शुभेच्छा WhatsApp Status, SMS, HD Greetings, Quotes
लक्ष्मीची होईल कृपा एवढी,
सगळीकडे होईल नाव दिवसरात्र व्यापारात वाढेल तुमचं काम
सर्व इच्छा होवो पूर्ण, लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
देवी लक्ष्मी घेऊन आली दारी सुख समृद्धीची बहार,
देवी करो पूर्ण तुमच्या इच्छा आणि मनोकामना स्वीकार,
लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा!
वाईटाचा अंत होऊन सत्याचा झाला विजय,
दिव्यांच्या रोषणाईने दूर झाले सर्वांचे दुःख,
घ्या हाच संकल्प परत न अंधकार,
न कोणी झुको वाईटाखाली पार,
कोणतंही संकट आल्यास त्याला करू मिळून पार.
दिवाळीच्या शुभेच्छा!
तुमच्या घरी होवो धनाची बरसात
होवो कोपराकोपऱ्यात लक्ष्मीचा वास
संकटांचा होवो नाश, शांतीचा होवो वास
शुभ दीपावली, शुभ लक्ष्मीपूजन!
मिठाई, फटाके आणि दिवे,
दिवाळी आहे सोनेरी,
लक्ष्मीपूजनात व्हा लीन,
वर्षभरानंतर आलं आहे लक्ष्मीपूजनाचं पर्व,
लक्ष्मीपूजनाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा!
महालक्ष्मीचे करून पूजन, लावा दीप अंगणी,
धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी.
लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा!
अंगणी भाग्यलक्ष्मीची स्वारी,
सुख-समाधान, आरोग्य आणि धनसंपदा,
गुंफून हात हाती, येवो तुमच्या दारी.
दीपावली आणि लक्ष्मी पूजन निमित्त
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!
झगमग-झगमग दिवे लागले,
दारोदारी आली दिवाळी,
दिवाळीच्या या शुभ दिवशी तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी.
या दिवाळीला तुमच्यावर अष्टलक्ष्मीची कृपा होऊ दे.
दिव्यांचा हा सण आहे खास
तुम्हाला मिळो सुखांचा सहवास
लक्ष्मी आली आपल्या द्वारी,
करा लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छांचा स्वीकार…
दिव्यांमुळे मिळेल आनंदाचा प्रकाश,
संपत्ती आणि मनःशांती…
लक्ष्मीपूजनाच्या पावन पर्वावर उघडेल भाग्याचं दार,
लक्ष्मीपूजन शुभेच्छा!
Lakshmi Puja wishes in Marathi 2024
दिव्याचा प्रकाश, फटाक्यांचा आवाज,
सूर्यकिरण, आनंदाचा वर्षाव,
चंदनाचा सुगंध, प्रियजनांचे प्रेम
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.
लक्ष्मीचा हात असो, सरस्वतीची साथ असो,
गणरायाचा निवास असो,
आणि माता दुर्गाच्या आशीर्वादाने
आपले जीवन नेहमी उजळून राहो.
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रांगोळीच्या सप्तरंगात
सुखाचे दीप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी
घर सुख-समृद्धीने भरू दे
लक्ष्मीपूजनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
महालक्ष्मीचे करुनी पूजन,
लावा दीप अंगणी
धनधान्य आणि सुख-समृद्धी,
लाभेल तुम्हा जीवनी
लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा!
तुम्हाला आई लक्ष्मीचा कायम आशीर्वाद मिळत राहो,
तुमच्या आयुष्यात आनंदाचे दिवस येत राहो,
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
लक्ष्मीची होईल कृपा एवढी,
सगळीकडे होईल नाव
दिवसरात्र व्यापारात वाढेल तुमचे काम
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.