Marathi Ukhane | Ukhane In Marathi Language l मराठी उखाणे 2024

By vedu Jan 18, 2024
Marathi Ukhane | Ukhane In Marathi Language l मराठी उखाणे 2024

Marathi Ukhane | Ukhane In Marathi Language 2024

उखाणे म्हणजे अशी एक अशी संकल्पना आहे जी मराठी संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. लग्नाच्या वेळी वधू-वर किंवा त्यांच्या नातेवाईकांना उखाणे घेण्यास सांगितले जाते. उखाणे हे एक प्रकारचे काव्यात्मक स्वरूप आहे जे एकंदरीत चार ओळींचे असते. या ओळींतून वधू किंवा वराच्या गुणांचे वर्णन केले जाते. उखाणे हे सहसा विनोदात्मक किंवा सूचक असतात.

उखाणे हे मराठी संस्कृतीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. ते आपल्याला आपल्या भाषेच्या सौंदर्याची आणि समृद्धीची ओळख करून देतात. उखाणे हे आपल्याला विनोदाची आणि कल्पनाशक्तीची चाचणी देतात.Marathi Ukhane Marathi

Marathi ukhane male l मराठी उखाणे नवरदेवासाठी

जन्म दिला मातेने पालन केले पित्याने,
… च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने.


नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री,
…..झाली आज माझी गृहमंत्री.


चांदीच्या ताटात, रुपया वाजतो खणखण,
…. चे नव घेऊन सोडतो आता कंकण.


राधे शिवाय कृष्णाला, उरनार नाही अर्थ,
…..शिवाय माझं, जीवनच व्यर्थ.


पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले,
…चं नाव घेतल्या वर चेहरा माझा खुले.


रुक्मीणीने केला पण कृष्णाला वरीन,
…च्या साथीने आदर्श संसार करीन.


हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात,
…च्या जीवनात लाविली मी प्रीतीची फुलवात.


कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास, मी भरवितो
……ला जलेबी चा घास.


प्रेम म्हणजे, दोन मनांना जोडणारा पूल
..च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला भूल.


लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम,
…ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.


पाहताच ………ला, जीव झाला येडापीसा,

तिच्या शॉपिंगच्या वेडापायी, रिकामा होतो माझा खिसा.


निर्सगवार करु पहात आहे आजचा मानव मात,अ
र्धागिनी म्हणुन …ने दिला माझ्या हातात हात.


सर्व फुलांचा राजा गुलाबाचे फुल, संसार करु सुखाचा
… तु, मी आणि एक मुल.


ढीगभर चपात्या, किती पटापट लाटतेस,
…….तू मला, सुपरवूमन वाटतेस.


प्रेमाच्या राणात, नाचतो मोर,
…..शी केल लग्न, नशीब माझ थोर.


गोऱ्या गोऱ्या गालावरती, तीळ काळा काळा,
……..च्या गोड हास्याचा, मला लागलाय लळा.


देव आमचा विठोबा, विटेवरी उभा,
……. ने वाढवली, आमच्या घराची शोभा.


गाडीत गाडी डेक्कन क्वीन,
…. आहे माझी ब्युटी क्वीन.


Marathi ukhane for female l मराठी उखाणे नवरी साठी

Marathi ukhane for female l मराठी उखाणे नवरी साठी

नदीच्या काठी कृष्ण वाजवितो बासरी
नदीच्या काठी कृष्ण वाजवितो बासरी,
( नाव पतीचे ) पाटलांचे नाव घेते मी आले सासरी.


हिरव्या साडीला कात आहे जतारी
हिरव्या साडीला कात आहे जतारी,
( नाव ) रावाचे नाव घेते शालू नेसून भारी.


अंगडी होती उमर उमरी ला आला बार
पाटलांनी माझ्यासाठी साडी घेतली हिरवी हिरवी गार
मंगळसूत्राच्या दोन वाटी सासू आणि माहेर
( नाव ) रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर


जन्म दिला मातेने पालन केले पित्याने
गणेश नावाचे रावांचे नाव घेते
पत्नी या नात्याने


संध्याच्या परीवर नागाची खून
( नाव ) रावांचे नाव घेते जगदाळे यांची सून


चांदीच्या परातीत केशराचे पेढे
चांदीच्या परातीत केशराचे पेढे,
आमचे हे सोडून बाकी सगळे वेडे.


उंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली
उंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली
राजेंद्र रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली.


लाल मनी तोडले काळे मणी जोडले
लाल मणी तोडले काळे मणी जोडले,
गणेश रावांसाठी आई-वडील सोडले.


सूर्य चंद्र तारे नकाशा चे सोबती
सूर्य चंद्र तारे आकाशाचे सोबती,
गणेश राव आहे माझे साता जन्माचे सोबती


नाव घ्या नाव घ्या आग्रह कशासाठी,
गणेश रावाचे नाव होते ओठावरती
पण थांबले उखाण्या साठी.


दत्ताच्या देवळात उदबत्त्यांचा वास
दत्ताच्या देवळात उदबत्त्यांचा वास,
गणेश रावांना भरवते पेढ्याचा घास.


नवीन उखाणे Ukhane For Female in Marathi | Funny Marathi Ukhane

नवीन उखाणे Ukhane For Female in Marathi
Funny Marathi Ukhane

इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून
इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून
कुठून अवदसा सुचली म्हणून झाली यांची सून


चंदनाच्या झाडावर कृष्ण वाजवितो बासरी
चंदनाच्या झाडावर कृष्ण वाजवितो बासरी
गणेश रावांचे नाव घेते सुखी आहे सासरी


मराठीत बोलतात भाजी हिंदीत बोलतात सब्जी
मराठीत बोलतात भाजी हिंदीत बोलतात सब्जी
गणेश रावांचे नाव घेते जय पब्जी


चांदीच्या ताटात मटणाचा रस्सा
चांदीच्या ताटात मटणाचा रस्सा
लग्न झालं की बोंबलत बसा


अटक मटक चवळी चटक चवळी ला आले मोड मोड
अटक मटक चवळी चटक चवळी ला आले मोड मोड
गणेश राव तिळगुळ सारखे गोडगोड


गुलाबाचे फुल दिसायला ताजे
गुलाबाचे फुल दिसायला ताजे
रावांचे नाव घेते सौभाग्य माझे.


हंड्यावर हंडे सात हंडे
हंड्यावर हंडे सात हंडे
सात त्यावर ठेवली परात
कोरोनाला हरवायला बसा आपल्या घरात.


दारी होती तुळस तुळशीला घालते पाणी
दारी होती तुळस तुळशीला घातलं पाणी
आधी होती आई बाबाची तानी
आता झाली विलास रावची राणी


ताजमहल बनवायला कारागीर होते कुशल,
ताजमहल बनवायला कारागीर होते कुशल,
रावांचे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल.


खूप फेमस आहे पुण्यामध्ये शनिवार पेठ
खूप फेमस आहे पुण्यामध्ये शनिवार पेठ,
सगळीकडे जाऊ या लोकडॉन नंतर भेट.


also read

Marathi Quotes For Instagram 2024 | Instagram Caption In Marathi 2024

Marathi Quotes For Anniversary 2024 | लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Ukhane For Female in Marathi

ताजमहल बनवायला कारागीर होते कुशल,
ताजमहल बनवायला कारागीर होते कुशल,
रावांचे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल.

By vedu

Related Post

One thought on “Marathi Ukhane | Ukhane In Marathi Language l मराठी उखाणे 2024”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *